सहज कपाट चाळता चाळता "राजा शिवछत्रपती" पुस्तक हाती लागले. लगेच वाचायला घेतले ..
दहावीच्या सुट्टीत आणि इंजिनीरिंगला असताना हे पुस्तक वाचले होते. त्यावेळी जमेल तेवढी कल्पनाशक्ती वापरून गड -किल्ले , रस्ते , गावे डोळ्यासमोर उभे करत असे .
पण आता मात्र गोष्ट वेगळी होती . आता पक्का भटक्या झालोय, नाही म्हटले तरी तीस एक किल्ले अन बराचसा कोकण, पश्चिम महाराष्ट्र फिरून झालाय. बराचसा महाराष्ट्राचा भूगोल समजलाय आता.
शिवनेरी , जीवधन , राजगड , तोरणा , रायरेश्वर , पन्हाळा , रायगड , सिंहगड - तानाजी कडा , पुरंदर असे एक एक गड पुस्तकातून बाहेर येत होते अन मी ह्या गडावरून त्या गडावर, महाराजांचा मावळा बनून महाराजांबरोबरच फिरून येत होतो (भूगोलासकट).
खऱ्या -खुऱ्या गडांवर , खऱ्या -खुऱ्या बुरुजांवर ..
मीही राजांबरोबर शिवनेरी ते जीवधन घोड्यावरून एका दमात रपेट मारून येत होतो,
त्या "तानाजी कड्या"वरून तानाजीबरोबरच वर चढून येत होतो .
अजूनही भरपूर किल्ले बाकी आहेत, बाजीप्रभूंची पावनखिंड पण बाकी आहे,
प्रतापरावांची नेसरी बाकी आहे.
पण हो मी जाणारच कारण ...
"सह्याद्रीला सवयच आहे शूरवीर वाघांना फूस लावायची..."(इति बाबासाहेब पुरंदरे-राजा शिवछत्रपती)
---BinaryBandya™
अरे वा! जाता जाता इनडायरेक्टली का होईना स्वत:ला शूरवीर वाघ म्हणून घेतलंस की.:) जाशील जाशील.
उत्तर द्याहटवामी कालच ’जैत रे जैत’ वाचलं (सहाव्यांदा)! खरोखरीच त्या कर्नाळ्याच्या बुधल्यावर जाऊन आलं असेल का याचा विचार करत होते. मला नाही मिळाली कधी संधी आणि मिळालीच तर तिथे पोहोचण्याची माझी ’L' आहे असं मला वाटत नाही किंवा माझी तेव्हढी तयारी नाही असं म्हण. पण पुढेमागे जाईनच. आप्पांनी बघितला तसा तो लिंगोबाचा डोंगर दिसतोय का मला तेव्हढं बघायचंय. तू जाऊन आलायेस का?
जाऊन आला असशील तर लिही काहीतरी. नाग्या ढोलियासारखं , ढोलियाच्या डोळ्यातून नाही बघता आलं तरी काय झालं, दुधाची तहान ताकावर.
अवांतर: फ़ोटो भारी. पहिल्या फ़ोटोतला अरविंद स्वामी फ़ेम आत्ममग्न पुरुष तूच आहेस काय?
श्रद्धा : धन्यवाद आणि ब्लॉग वार तुझे स्वागत
उत्तर द्याहटवा>>स्वत:ला शूरवीर वाघ म्हणून घेतलंस की
थोडाफार माज केला तरी चालतोच की नाही का ?
>>अरविंद स्वामी फ़ेम आत्ममग्न पुरुष
हो तो मीच, मला जाम हसू आले म्हणे "अरविंद स्वामी फ़ेम आत्ममग्न पुरुष"
कर्नाळ्याला अजून तरी गेलो नाहीये गेल्यावर नक्की लिहीन ...
"सह्याद्रीला सवयच आहे शूरवीर वाघांना फूस लावायची..."..
उत्तर द्याहटवावाह..... भटकंतीसाठी शुभेच्छा.. आम्ही आपल्या फोटोंमधून आनंद घेतच राहू.... :)
धन्यवाद इंद्रधनू
उत्तर द्याहटवातीस एक किल्ले ?? वाह.....
उत्तर द्याहटवाफ़ोटो मस्तच आहेत रे...तू सांगितलेलं पुस्तक नाही वाचलं अजून पण वाचयला नक्की आवडेल..मी वाचायचे त्यात जास्त करून व्यंकटेश माडगूळकरांची जंगल भटकंती असे...त्यामुळे गड तसे कमीच झालेत...
शूरवीर वाघा, असाच भटकत रहा.... :)
उत्तर द्याहटवाआमच्यासाठी कधी नखं मात्र काढू नकोस हा! :p
@
उत्तर द्याहटवाअपर्णा: धन्यवाद आणि ब्लॉगवार स्वागत
जंगल भटकंती आता मी वाचेन ..
@अनघा :
ओळखीच्या माणसांवर नखे नाही काढत आम्ही ..
"सह्याद्रीला सवयच आहे शूरवीर वाघांना फूस लावायची..."
उत्तर द्याहटवासह्याद्रीला बघुन अंगात स्फुरण येत नाहि असा माणुस विरळाच
पटले एकदम !!!
पहिला फोटो खुप छान आहे.
@आशिष : ब्लॉगवर स्वागत , आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद .
उत्तर द्याहटवाEk number
उत्तर द्याहटवाधन्यवाद गौरव
उत्तर द्याहटवा