मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२

सिंधुदुर्ग - तारकर्ली - विजयदुर्ग

मागच्या आठवड्यात कोकणात फिरणे झाले. सिंधुदुर्ग, कणकवली, मालवण , तारकर्ली , विजयदुर्ग आणि देवगड.
काही फोटो इथे देत आहे . बघा आवडतात का..

निळेशार पाणी आणि सुंदर सिंधुदुर्ग. (पावसाळ्यात भेट देऊ नका - पाणी गढूळ असते.)

सिंधुदुर्ग 

सिंधुदुर्ग 

सिंधुदुर्ग 

सिंधुदुर्ग तटबंदी 

 सिंधूदुर्गावर शिवाजी महारांचे मंदिर आहे. शिवप्रेमींनी आवर्जून भेट द्यावे असे. (राजाराम महाराजांनी बांधले आहे.) एक तलवार आहे जी शिवाजी महाराजांनी युद्धात वापरलेली आहे .
शिवाजी महाराजांचे मंदिर 

तारकर्लीचा समुद्रकिनारा सुंदर तर आहेच शिवाय इकडे water sports सुद्धा आहेत. MTDC Resort सुंदरच आहे. शिवाय आम्ही थांबलो होतो ते "विसावा" पण सुंदरच आहे.
MTDC तारकर्ली 

तारकर्ली समुद्रकिनारा 



तारकर्ली - मासेमारी 
 पहाटे पहाटे समुद्र किनाऱ्यावर गेला तर वेगवेगळे जाळ्यात अडकलेले मासे नक्की बघायला मिळतील.
 
मासेमारी






विजयदुर्ग 
 विजयदुर्ग सुद्धा भेट द्यावा असाच आहे. अजूनही सुस्थितीत  असलेली तटबंदी अतिशय सुंदर आहे .
विजयदुर्ग तटबंदी