धुक्यात हरवलेला घनगड |
आम्ही सहाजण पुण्यावरून गेलो होतो. विशाल, माधव, सुरेश, प्रशांत, सुदर्शन आणि हो मी पण. नेहमीचाच ग्रुप. ताम्हिणी म्हटले की सगळेच तयार.
आमची गँग |
ताम्हिणी म्हणजे काय विचारूच नका. खरेतर ताम्हिणीमध्ये देवाने स्वर्ग बांधायला घेतला होता आणि बांधलाही. फक्त देव राहायला आले नाहीत एवढाच काय तो स्वर्गात आणि ताम्हिणी मध्ये फरक.
रिमझिम पाउस, धुक्याची दुलई आणि
बुरुजात लपलेला घनगडाचा दरवाजा |
गप्पा मारत, जंगलात घुसलो अन जंगलाचा ओळखीचा वास नाकात घुसला. अहा अशा वातावरणात मी/आम्ही तासंतास चालू शकतो. कधी गडावर पोहोचलो ह्याचा पत्ता पण लागला नाही. वाटेत एक लहानसे मंदिर लागले. कशाचे मंदिर होते बरे, विसरलो. पुढच्यावेळेपासून ह्या
नोंदी ठेवत जाईन.
गड तसा लहानसाच आहे , तासाभरात चढून होतो आणि वरती २० मिनिटात पाहूनही होतो. गडावर फक्त बुरुजांचे अवशेष आहेत बाकी काही नाही.
कोराई गड |
पण इकडून तुमची नजर थेट कोकणातच पोहोचते. कोकणात उतरणारे कडे एकदम खासच.कितीही वेळ गडावर बसला तरी कंटाळा नक्कीच येणार नाही. त्या दऱ्या, डोंगर कितीही नजरेत भरून घ्या, मन काही भरणार नाही. समोर सुधागड,
कोराईगड दिसतात आणि तैलबैला आपल्याच थाटात उभा असलेला दिसतो.
आणि हो गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ उजव्या बाजूला एक मोठीशी शिळा गडाला टेकून उभी आहे .
किती मोठी आहे बघायची आहे , तर मग हा फोटो बघा .
इथे आतमध्ये काही देव आहेत शेंदूर फासलेले.
आणि छोटीशी गुहा.
मस्त आहे ना? |
एकावर एक कितीतरी स्फटिक रचून ठेवावेत जणू , बारावीच्या भूगोलात अशा दगडांना काय म्हणतात ते होतं पण आता कोणाला आठवणार!
आणि कोणी कृपा करून अजिबात विचारू नका प्रत्येकवेळी अशीच पोज का देतो म्हणून.
आणि शिडी चढताना जरा जपून, शिडी संपल्यावर डावीकडे वळायचे आहे , तिथे वाट लागते , जरा जपूनच चढा.
हीच ती शिडी , अगोदर इथे फक्त एक दोरी होती ... |
परत येताना ताम्हिणी घाटामध्ये पण छान धुकं होतं. परत येताना घेतलेले काही फोटो.
ताम्हिणी मधले रस्ते |
जवळच. पुण्यापासून ८०-९० किमी. ताम्हीनीला जायचे , तिथून लोणावळा रस्ता घ्यायचा आणि भांबर्डे गाव गाठायचे
ह्याच गावातून गडावर जाता येते .
किंवा लोणावळ्यावरून -अॅंम्बी व्हॅली - भांबर्डे गाव असेही येता येईल.
आम्ही जाऊ शकतो का ?
हो , साधा-सुधा ट्रेक आहे. तुम्हीही जाऊ शकाल. शेवटच्या टप्प्यामध्ये जरा सावधगिरी बाळगा. बस पोहोचलाच.
आणि मदत हवी असेल तर आम्हाला विचारा ना राव ...
---BinaryBandya™
:D :D
उत्तर द्याहटवावेगवेगळे शब्द मनात आले....एकेक वाचता वाचता...!
म्हणजे....
हाsssssss!
कित्ती मस्त!
आईशप्पत!
श्या! मी कधी करणार हे?!
सॉलिड!
सोप्पेय! :p
वॉव... सहीये घनगड...
उत्तर द्याहटवा@अनघा: धन्यवाद , एकदा तरी करावा असा ट्रेक .
उत्तर द्याहटवा@ इंद्रधनू : धन्यवाद
अभि, मस्तच रे!!
उत्तर द्याहटवाभन्नाट अनुभव..
उत्तर द्याहटवाफ़ोटो अप्रतिमच :)
@विशाल, श्रीराज : धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत .
उत्तर द्याहटवाकरवंदे (काळी मैना )पण मस्तच होती चवीला जंगलामध्ये ..
उत्तर द्याहटवाआणि गडावर जाताना कोणता साप दिसला होता रे...?
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाअरे हो ते लिहायचेच राहिले ..
उत्तर द्याहटवासाप नाही ओळखता येत आपल्याला अजून :)
आम्ही धनगडला वळसा घालुन खाली पाच्छापुरच्या वाडीस उतरलो होतो, खोगीर खिंडीतुन, या वाटेवर तैलबैला मस्त दिसतो, रात्री मुक्काम पठारावरील धनगरवाडीत. आनंद पाळंदेच्या पुस्तकावर जो तैलबैलाचा फोटो आहे तो याच बाजुने काढलेला.
उत्तर द्याहटवाभांबुर्डेवरुन जो रस्ता पुण्याकडे जातो त्याच रस्तावर दोन अप्रतिम ठिकाणे आहेत, अंधारबन ( जे प्लस वॅली कडुन समोरच्या बाजुस दिसते ) व दुसरे नितांत सुंदर बेट , सुसाळे. मुक्कामाला सर्वोत्तम
पुढच्या वेळी नक्कीच अंधारबनला जाऊ
उत्तर द्याहटवाहरेकृष्णाजी ब्लॉगवर स्वागत :)
sundar kharach
उत्तर द्याहटवाamhala pan jayla hav nakkich
wow !! mala pan ashich vegali thikane awadtat. ani kahi asalyas yethe taka. mi hi kalvin. toparyant jamalyas amachya hya blog la bhet dya va kadhitari ekadehi vat vakadi kara. yethehi kahi masth thikane ahet.
उत्तर द्याहटवारिमझिम पाउस, धुक्याची दुलई आणि
उत्तर द्याहटवाबुरुजात लपलेला घनगडाचा दरवाजा
ट्रेकिंग - जगातले सगळ्यात वाईट व्यसन आहे हे !!!
same here dude
:)
उत्तर द्याहटवा