सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

शिवजयंतीला सिंहगडशिवजयंतीला रायगडला जायचं आमचा बेत
फसला, पण चैनच पडेना म्हणून मग कमीतकमी सिंहगडावर तरी जायचेच असे ठरवून घराबाहेर
पडलो. पण आमचे बेत सगळेच फिस्कटत गेले. गडाच्या पायथ्याला पोहोचल्यावर कळाले "काम चालू रस्ता बंद". मग काय "पावले चालती पंढरीची वाट" .
चालत जावून तानाजींना मुजरा घालायचा, सूर्यास्त बघायचा आणि लगेच परत फिरायचे असे ठरले.


 आमच्या नेहमीच्या ग्रुप बरोबर आज एक नवीन मावळा आला होता , त्याच्या वजनामुळे त्याला ढकलत ढकलत गडावर न्यावा लागला. पण पोहोचलाच तो गडावर .


गडावर पोहोचेपर्यंत सूर्याने क्षितिजावरून कल्टी मारली होती. सूर्य मावळला होता पण अजून त्याच्याकडून  क्षितिजावर विस्कटलेले रंग आवरायचे राहिलेच होते. आम्ही जमेल तेवढे रंग आमच्या कॅमेऱ्यात भरून घेतले. हे रंग तुमच्यासाठी ....


गडावर येताना "जय शिवाजी -जय भवानी" च्या घोषणा , ढोल-ताशांचा आवाज येत होता. आम्ही आज उशीराच आलो लवकर यायला हवे होते . गडावरून परत जाणाऱ्याच्या प्रत्येकाच्या कपाळावर गुलाल,कुंकू छान दिसत  होते. बरेच जण कुर्ता -पायजमा, फेटे अशा पेहरावात होते. छानच वाटत होते.
नंतर तानाजींच्या पुतळ्याला कुर्निसात, त्याचबरोबर भगवा झेंडा आणि शिवाजी महारांजाच्या प्रतिमेला कुर्निसात घालून परतीची वाट धरली. 

" सिंहगडावर जावून कांदाभजी नाही खाल्ली तर पाप लागते " म्हणे, म्हणून ७-८ प्लेट भजी ५ जणांनी खाल्लीच.

एवढे सगळं करेपर्यंत भरपूर अंधार झालाच होता. गडावर शांतता - छानच . पण
उतरायला सुरुवात केली तेवढ्यातच चंद्र उगवलाच.

मित्रांमध्ये वाद चालले होते-  एक म्हणे  फक्त सूर्यच उगवतो आणि मावळतो, चंद्र उगवत-मावळत नसतो , खरे खोटे काय ते चंद्र-सूर्यालाच माहित. एवढं मात्र नक्की आम्ही कशावरही वाद घालू शकतो .


चंद्र अप्रतिमच दिसत होता . त्याचे काही फोटोग्राफ्स ..
काही ठिकाणी आमच्यातला फोटोग्राफर जागा होतो
आणि मग  मागे राहिलो की बाकीच्या लोकांच्या आम्ही
शिव्या खातो . चालायचेच.

     कोणाकडे battery नव्हतीच, नशीब पोर्णिमा नुकतीच
होऊन गेली होती, त्यामुळे चंद्र पूर्ण जोषात होता.
गडावर अगोदरच आम्ही वाद घातला होता -पोर्णिमा झाली की अमावस्या चंद्र उगवल्यामुळे ह्या वादावर पडदा (उजेड?) पडला.


चंद्राच्या कृपेमुळे अडखळत- धडपडत का होईना पण शेवटी दहा-साडेदहाला पायथ्याला पोहोचलो. मग गाड्या घेऊन डायरेक्ट पुणे ...
---BinaryBandya™

१५ टिप्पण्या:

 1. फोटो खूपच आवडले !!!! फोटोत फोटोग्राफर पेक्षा कलावंताच दिसला.

  उत्तर द्याहटवा
 2. बंड्या, हा लेख कोणी तरी 'अभिजित' म्हणून तुझ्या ब्लॉगवर का बरं टाकलाय? :p
  फोटो अप्रतिम! आणि राहिलेले रंग कॅमेरात भरून घेतलेस ते बरं केलंस! नाही तर 'राज कपूर स्टाइल'चे कृष्ण धवल फोटू बघायला लागले असते! :)

  उत्तर द्याहटवा
 3. @विजय : धन्यवाद आणि ब्लॉगवर तुमची स्वागत ..
  @अनघा : हेहे , नाव बदलले आहे ..
  राज कपूर स्टाइल फोटो :)

  उत्तर द्याहटवा
 4. तुम्ही केलेली भटकंती अविस्मरणीय नक्कीच झाली असेल :)
  बंड्या .. तुझे असे निसर्गला जवळ करणे म्हणजे तुझ्यतील माणुसकी जिवंत असल्याचे लक्षण आहे ...
  आणि तानाजींना नमन म्हणजे प्रखर राष्ट्रभक्तीचे उदाहरण ...
  अशयाच गोष्टींमधून राष्ट्रप्रेम प्रज्वलीत होत राहते .. खूप छान ..

  उत्तर द्याहटवा
 5. बंड्या .. फोटो खूपच नैसर्गीक आले आहेत .. आणि भाषाही ओघवती आहे .. :)

  उत्तर द्याहटवा
 6. @अभिमन्यू : तुमची विचार छान आहेत .
  ब्लॉगवर तुमचे स्वागत
  आणि आभार.

  @शिरीष : धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 7. पण चंद्र उगवतो आणि मावळतोच ...आमचा गावा कडे तर असंच होतं... :)
  चाबूक वर्णन केलेला आहे .... आत्ता प्रत्येक भटकंती चा तूच लिहित जा ...

  उत्तर द्याहटवा
 8. सिंहगडावर जावून कांदाभजी नाही खाल्ली तर पाप लागते ...आणि कांदाभजी खाऊन मटका दही नाही खाल्लं तरी पापच लागत..ते खाल्लत की नाही???

  उत्तर द्याहटवा
 9. हेहे ,
  रात्र झाली होती त्यामुळे मटका-दही नाही खाल्ले .
  एकूणच आम्हाला पाप लागले आहे .
  पुढच्या वेळी गेलो की डब्बल खातो म्हणजे पाप धुतलं जाईल

  उत्तर द्याहटवा
 10. चंद्राचे फोटो एकदम क्लास! ब्लॉगही झकास आहे.

  उत्तर द्याहटवा
 11. khupach chaan lekh ahe. ani ho tumchya trak baddalhi wachle mastach........laiyeeee bhariiiiii rao.

  उत्तर द्याहटवा