पुण्यावरून फक्त ३० किलोमीटर , दिवेघाट ओलांडला की डावीकडे सोनोरी गावात वळायचे . ४-५ किलोमीटर जात नाही तोवरच उजव्या हाताला एक मोठा दरवाजा दिसतो . इथे ज्यांनी मल्हारगड बांधला त्या पानसे सरदारांच्या वाड्याचे अवशेष आहेत . गडाच्या पायथ्यापर्यंत तुमची चार-चाकी गाडीही आरामात जाऊ शकते. गडाच्या पायथ्यापासून माथ्यावर पोहोचण्यास फारतर ४५ मिनिटे लागतात . गडावर खंडोबा आणि महादेवाची प्रेक्षणीय अशी मंदिरे आहेत . गडाचा पसारा फार मोठा नाहीये, १५-२० मिनिटात सगळा गड पाहून सुद्धा होतो .
दिवेघाटावर टेहाळणी करण्यासाठी पेशव्यांच्या कारकिर्दीत हा गड बांधला गेला. गडाची तटबंदी अजूनही शाबूत आहे . आतमध्ये १-२ पडक्या अन कोरड्या विहरी आणि आतल्या लहान किल्ल्याचे काही अवशेष सोडले तर गडावर मोठे असे बांधकाम नाहीये. गडाचे बुरुज, तटबंदी पण राजगड-सिंहगड सारखे मोठ्या आकाराच्या नाहीयेत . गडावरून लोणी परिसर ,सासवड परिसर दूरवर पसरलेला दिसतो.
पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे गडावर फारसे लोक -पर्यटक येत नाहीत . खरेच मनापासून जे भटके लोक आहेत ते येतात . त्यामुळे गडाचा परिसर अगदी स्वच्छ आहे , प्लास्टिक च्या बाटल्या नाहीत , केर कचरा नाही . गडावर गेल्यावर मन अगदी प्रसन्न होते.
पाण्याची आणि जेवणाची सोय स्वतःच करावी. गडावर पाणीही नाहीये अन खायला काहीही मिळत नाही . आणि जर कोणाला गडावर राहायचे असेल तर महादेवाच्या मंदिरात ५-६ जण राहू शकतात.तुम्हाला शांत आणि गर्दी नसलेल्या ठिकाणी जायचे आहे अन ते पण पुण्याजवळ तर मल्हारगड एक चांगला पर्याय आहे .
गडावरून सूर्योदय फार छान दिसतो . आम्ही पहाटे ५ लाच पुण्यातून निघालो होतो आणि ६.३० ला गडावर पोहोचलो देखील सूर्याच्या अगोदर . भरपूर वेळ वाट पाहायला लावली पट्ठ्याने मग उगवला एकदाचा .
मस्त पोज दिली त्याने .
उपयुक्त माहिती:
रस्ते:
* पुणे-दिवेघाट-सोनोरी-मल्हारगड
* पुणे-दिवेघाट-झेंडेवाडी-मल्हारगड
आसपासचा परिसर:
* सासवड , दिवेघाट , पुरंदर-वज्रगड , नारायणपूर
-- अभिजित
आसपासचा परिसर:
* सासवड , दिवेघाट , पुरंदर-वज्रगड , नारायणपूर
-- अभिजित
I found this article here. http://x.993347.n3.nabble.com/-tt3182021.html .
उत्तर द्याहटवाlekh chorala maza...:(
उत्तर द्याहटवाkuthala ani kunacha ka asena amala changli mahiti milali. Doghanahi dhanyawad. Ashet jar kolhapur la treck cha plan asel tar paha http://kolhapurdarshan.blogspot.com
उत्तर द्याहटवा