मंगळवार, १२ जुलै, २०११

कळसुबाई

ह्या पावसाळ्यातला पहिला ट्रेक कुठला करायचा असा प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार होते - कळसुबाई पुण्याहून अंदाजे २०० किमी. आणि भंडारदरा धरणापासून ६किमी. भंडारदरावरून बारी (कळसुबाईच्या पायथ्याचे गाव) फक्त ६ किलोमीटर आहे.
धुक्यात हरवलेले कळसुबाईचे शिखर 
रंधा धबधबा


रस्त्यात भंडारदरा रस्त्यावरच उजव्या हाताला  रंधा धबधबा आहे. अतिशय सुंदर असा हा धबधबा एकदा तरी बघावाच. धबधबा ज्या घळीत उतरतो ती घळई (प्रवरा नदी )सुद्धा छान दिसते.  आख्खं बालपण गेलंय ह्या नदीच्या काठावर त्यामुळे जरा जास्तच प्रेम आहे ह्या नदीबद्दल .











ही शिडी डायरेक्ट स्वर्गात जाते ..

शेंडी गावात(भंडारदरा) जरा नाश्ता केला  आणि तिथून थेट कळसुबाई गाठले .
 बारी गावात कळसुबाई मंदिराजवळ गाडी लावण्याची सोय आहे . तिथूनच होते ट्रेकला सुरुवात :)

तसा ट्रेक काही अवघड नाहीये कारण जिथे जिथे अवघड रस्ता आहे तिथे तिथे लोखंडी शिड्या आहेत. अगदी ५०-५० फुट उंच शिड्या देखील आहेत.

 






आम्ही चढाईला सुरुवात केली पण धुक्यात हरवलेले कळसुबाईचे शिखर काही दिसतच नव्हते. त्यामुळे किती चढावे लागणार ह्याचा काहीच अंदाज येत नव्हता. तास दीड तास चढून गेल्यावर कळसुबाईला असलेली ढगांची मिठी सुटली आणि शिखराचे दर्शन झाले. हो महाराष्ट्रातले सगळ्यात उंच शिखर.


कळसुबाई


 काय सांगू तिथे गेल्यावर काय काय मनात येते .

सुंदर अतिशय सुंदर ..
अतिशय जोरात वाहणारा वारा ,
वाऱ्याबरोबर पळणारे काळे-पांढरे ढग,
ढगांच्या मिठीत अडकलेले डोंगर,
डोंगराच्या अंगाखांद्यावर झुलणारी हिरवी झाडे
आणि ह्या अशा निसर्गाच्या प्रेमात पडलेले आम्ही सारेजण ...







शिखरावर लहानसे देवीचे मंदिर आहे भगव्या रंगात रंगवलेले.
मंदिरासमोर आहे एक लोखंडी गज त्याला अडकवल्यात बऱ्याचश्या लहानमोठ्या घंटा, रंगबेरंगी कापडाचे तुकडे आणि एक-दोन  त्रिशूळ.  त्यातली गूढता मनाला अशी काही खेचत होती की त्याकडे कितीही वेळ बघितले तरी मन भरतच नव्हते.













मध्येच येणारी पावसाची सर बापरे!!! अक्षरशः सुया टोचल्यासारखे पावसाचे थेंब लागत होते. पण जर असा ट्रेक असेल तर कसलाही पाउस मंजूर.


 काही छायाचित्रे ..
भंडारदरा धरणाची भिंत 






उपयुक्त माहिती:

रस्ते:
*  पुणे-संगमनेर -अकोले - भंडारदरा - बारी - कळसुबाई


आसपासचा परिसर:
* भंडारदरा (६ किमी), रतनगड - अमृतेश्वर मंदिर (अंदाजे २५ किमी), रंधा धबधबा (१० किमी)
* अलंग- मदन- कुलंग , सांधण


---BinaryBandya™


१० टिप्पण्या:

  1. :( जळण्याचा वास येतोय का रे तुला ?!
    ;) :)

    उत्तर द्याहटवा
  2. छान छान ... सुंदर .. कळसुबाई एकदा तरी गेलच पाहिजे ...

    उत्तर द्याहटवा
  3. माझा पण ह्या पावसाळ्यातला पहिला ट्रेक कळसुबाईच आहे... :)
    >>मध्येच येणारी पावसाची सर बापरे!!! अक्षरशः सुया टोचल्यासारखे पावसाचे थेंब लागत होते. पण जर असा ट्रेक असेल तर कसलाही पाउस मंजूर. +१

    उत्तर द्याहटवा
  4. मी मराठीवर वाचले तुमच्या ट्रेकबद्दल :)

    उत्तर द्याहटवा
  5. तुमचे ब्लॉग छान आहेत. www.globalmarathi.com वर पण पोस्ट करा आम्हाला तेथे वाचायला आवडतील

    उत्तर द्याहटवा